Tuesday, February 26, 2013

स्वप्रतिमा तयार करताना



स्वप्रतिमा तयार करताना

कुठल्याही क्षेत्रात मिळणारे यश हे प्रयत्नांवर अवलंबून असते. प्रयत्न हे ध्येयांवर अवलंबून असतात. आपण स्वत:साठी कुठले ध्येय निवडतो हे आपल्या 'स्वप्रतिमेवर' अवलंबून असते. तेव्हा या स्वप्रतिमेची जडणघडण कशी होते आणि जर आपल्या स्वप्रतिमेत आमूलाग्र बदल घडवून आणायचे असतील तर काय केले पाहिजे याचा विचार करू या.


मुलांच्या भावनिक व मानसिक सशक्तीकरणासाठी तीन सूत्रांची गरज आहे. पहिले सूत्र म्हणजे या विषयाशी संबंधित माहिती गोळा करणे. (Information) दुसरे सूत्र म्हणजे संप्रेरणा (Inspiration) म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्यातच सुप्तावस्थेत असलेल्या शक्तिस्थानाची ओळख करून देणे आणि त्याला जे वाटते त्यापेक्षा हजार पटीने अधिक अशी क्षमता त्याच्यात आहे याची जाणीव करून देणे. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे परिवर्तन (Transformation) म्हणजे आपण एका विशिष्ट परिस्थितीला विशिष्ट तऱ्हेने प्रतिक्रिया व्यक्त करतो. परिवर्तन म्हणजे परिस्थिती तीच पण आपली प्रतिक्रिया मात्र वेगळी असणे. या त्रीसूत्रीचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आपल्याला थोडे मानसशास्त्र जाणून घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक मानवी जीव जेव्हा जन्माला येतो तो एखाद्या संगणकासारखा असतो. संगणकाचे प्रामुख्याने दोन भाग असतात. एक भाग म्हणजे हार्डवेअर म्हणजे किचकट इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, ज्यांचा संगणक बनलेला असतो. ते संगणकाचे शरीर आणि दुसरा भाग म्हणजे 'सॉफ्टवेअर'. संगणक ज्या आज्ञावलीचा (Algorithm) वापर करून काम करतो ती ऑपरेटिंग सिस्टम. माणसाचेही तसेच असते. हार्डवेअर म्हणजे शरीर आणि सॉफ्टवेअर म्हणजे एक सव्‍‌र्हायव्हल (Survival) नावाची आपरेटिंग सिस्टम. जी जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असते.
या आज्ञावलीनुसार प्रत्येक जिवाला आपल्या पंचेंद्रियांच्या साहाय्याने आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करावे लागते. त्याचा अनुभव घ्यावा लागतो. त्या नंतर तो अनुभव जगण्याच्या दृष्टीने उपकारक की अपायकारक आहे या विषयी निष्कर्ष काढावा लागतो. ती घटना या निष्कर्षांसकट आपल्या स्मृतीकप्प्यात कायमची साठवली जाते. त्याचा उपयोग तशाच तऱ्हेच्या किंवा तत्सम वाटणाऱ्या भविष्यकालीन घटनांना प्रतिक्रिया देण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या रांगणाऱ्या बालकासमोर एखादी जळती मेणबत्ती ठेवली आणि आजूबाजूला कोणी लक्ष देणारे नसेल तर आज्ञावलीनुसार तो त्या मेणबत्तीचा अनुभव घेऊ पाहतो आणि ज्योतीवर हात ठेवतो, हाताला चटका बसताच त्या मेणबत्तीचे चित्र 'धोकादायक' अशा निष्कर्षांसकट मनात साठवले जाते व पुन्हा जर तो अशा मेणबत्तीच्या संपर्कात आला तर आता शहाणे झालेले ते मूल त्या मेणबत्तीला हात लावणार नाही. त्याच्यासमोर जर आजकाल मिळणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मेणबत्त्या ज्या तशाच लुकलुकतात त्या जरी ठेवल्या तरी तो त्याला हात लावणार नाही. अशी प्रक्रिया फक्त मानवच नव्हे तर थोडय़ाफार फरकाने सर्वच प्राणी वापरतात. पण मानवात आणि इतर प्राण्यांमधला महत्त्वाचा फरक असा की, फक्त जिवंत राहणे हेच मानवी जीवनाचे ध्येय कधीच नसते. त्याला निरंतर प्रगतीची ओढ लागलेली असते. प्रगती करण्यासाठी काही तरी नवीन घडवावं लागतं. त्यासाठी या प्रक्रियेला छेद देण्याची 'रिस्क' घ्यावी लागते. मानवाने आजपर्यंत असे अगणित धोके पत्करलेले आहेत म्हणूनच आजची ही प्रगतिमान आधुनिक संस्कृती आपण आजूबाजूला पाहतो. खरे म्हणजे यातच माणसाचे 'माणूसपण' साठवलेले आहे.
लहान मूल जेव्हा जन्माला येते ते कोरी पाटी घेऊन! तो व्यक्ती म्हणून कोण आहे? त्याची क्षमता काय? याची त्याला काहीच जाणीव नसते. मी कोण आहे याच्या तो सतत शोधात असतो. अशा वेळी त्याच्या आयुष्याला पहिला आरसा म्हणजे त्याचे आई-वडील! त्यांनी कळत-नकळत केलेल्या विधानांचा तो अर्थ काढतो. त्यावर विश्वास ठेवतो. आई म्हणते तू वेंधळा आहेस, तापट आहेस किंवा हळवा आहेस. तेव्हा तो वेंधळा किंवा तापट किंवा हळवा होतो. जसजसे हे मूल मोठे होत जाते तसतसे त्याच्या 'आरशांची' संख्या वाढायला लागते. आता त्यात त्याचे नातेवाईक, आजोबा, आजी, काका, मोठे भाऊ, शाळेतले शिक्षक, इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये मिळणारे मार्क्सदेखील सामील होतात. त्या प्रत्येकाने त्याच्याविषयी व्यक्त केलेली मते त्याला खरी वाटतात आणि त्यातून त्याचे एका विचित्र आकाराचे व्यक्तिमत्त्व साकारतं. ज्याचा आकार आजकालच्या मॉर्डन पेंटिंगइतकाच अतक्र्य आणि अनाकलनीय असतो. काही झाले तरी तो 'मी' असतो. मला जर जगायचे असेल तर मी ज्याला माझे म्हणतो असे व्यक्तिमत्त्व जिवंत रहायला हवे. त्याला कळत असते वेंधळपण असणे जीवनात फार उपयोगाचे नाही पण तो मोठय़ा प्रेमाने आपले वेंधळेपण जपत राहतो. थोडक्यात आपल्या संपर्कात अनेक व्यक्ती येतात त्या अनवधानाने किंवा मुद्दाम काही 'रिमार्कस्' पास करतात, अनेक परीक्षांना आपण सामोरे जातो त्यात कधी जास्त कधी कमी मार्क्स मिळतात. शिक्षक आपल्याविषयी काही निष्कर्ष काढतात. उदा. ''तू ना गणितात हुशार, पण भाषा विषय मात्र जमणं कठीण!'' अशा तऱ्हेच्या अनेक अनुभवांचे अर्थात रूपांतर केले जाते. त्यातून आपला जिच्यावर काहीच प्रभाव नसलेली, एक आत्यंतिक योगायोगाने बनलेली 'स्वप्रतिमा' आकाराला येते. हे म्हणजे आपण जर एखाद्या खेडय़ाच्या जत्रेत गेलो तर तिथे एक आरसेमहल असतो. त्यातल्या प्रत्येक आराशामधले आपले प्रतििबब वेगवेगळे असते. एकात आपण प्रमाणाबाहेर फुगलेले दिसतो, दुसऱ्यात अगदीच काटकुळे दिसतो, तिसऱ्या आरशात डोके मोठे पायाची मात्र काडी झालेली असते, या सगळ्या प्रतिमा हीच आपली खरी प्रतिबिंबे आहेत, असे जर गृहीत धरले तर जो काही प्रचंड गोंधळ होईल तो म्हणजे आपली 'स्वप्रतिमा!'
थोडक्यात, आपल्या स्वत:विषयीच्या आणि स्वक्षमतेबद्दल असणाऱ्या धारणा या भूतकाळात केवळ योगायोगाने घडलेल्या घटनांचे जे नकारात्मक निष्कर्ष काढले जातात त्यांची निष्पत्ती असते. शिक्षक म्हणून मी अनेक वेळा अनेक विद्यार्थाच्या बाबतीत हे अनुभवलेले आहे. एका परीक्षेच्या निकालानंतर एक मुलगा हसत हसत वर्गाबाहेर चालला होता. त्याला विचारले, ''काय रे किती मार्क्स मिळाले?'' तर तो सहज म्हणाला, ''सर फक्त ५०पकी फक्त १०.'' मी म्हणालो, ''याचे तुला काहीच वाटत नाही, एवढे कमी मार्क्स मिळाले तरी?'' तो म्हणाला, ''सर होतं असं कधी कधी, मागच्या वेळेला नाही का चांगले मार्क्‍स मिळाले. पुढच्या वेळी बघा मी दाखवतो चांगले मार्क्स मिळवून.'' आणि तो निघून गेला त्याच वेळी एक दुसरा विद्यार्थी अगदीच रडकुंडीला आला होता. त्याला विचारलं तर तो म्हणाला, ''सर ५०पकी फक्त १०च मार्क्स मिळाले, सर मला नाही वाटत की मी आय.आय.टी.त जाऊ शकेन! '' म्हणजे घटना एकच होती परंतु निष्कर्ष मात्र कमालीचे विरुद्ध होते आणि त्यामुळे निर्माण होणारे भविष्यदेखील वेगळे होणार होते. एक मुलगा जोमाने अभ्यासाला लागणार होता, दुसरा मात्र निराशेच्या गत्रेत खोल रुतत चालला होता, हळूहळू पराभूत मनोवृत्तीच्या बळी होत होता.
दुसरे उदाहरण घेऊ या, दोन विद्यार्थी एका परीक्षेला बसतात. एकाला ८५ तर दुसऱ्याला ७५ मार्क्स मिळतात. पुढच्या परीक्षेमध्ये दोघांनाही ८० टक्के मार्क्स मिळतात परंतु पहिला त्यामुळे निराश होतो. दुसरा विद्यार्थी मात्र खूष होतो. नंतर जेव्हा परीक्षा घेतली जाते तेव्हा पहिल्याला ७५ टक्के आणि दुसऱ्याला मात्र ८५ टक्के मार्क्स मिळतात. खरे म्हणजे घटना तीच पण भूतकाळ वेगळा आणि त्यामुळे निघणारे निष्कर्ष वेगळे व भविष्य मात्र निष्कर्षांनुसार वेगवेगळे!
लक्षात घ्या, घटना या प्रत्यक्षात घडतात पण अर्थ मात्र मनात असतात. एकाच घटनेचे अनेक अर्थ काढता येतात आणि त्यातल्या एक अर्थच खरा किंवा खोटा असे नसते. परंतु आपली ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला अर्थ काढल्याशिवाय गप्प बसू देत नाही तेव्हा दोन तऱ्हेचे निष्कर्ष घटनांमधून काढता येतात. पहिल्या तऱ्हेचे निष्कर्ष नकारात्मक आणि आपली गती खुंटविणारे असतात. तर दुसऱ्या प्रकारचे निष्कर्ष आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे नेणारे असतात. कुठले निष्कर्ष निवडायचे याचे मानव म्हणून आपल्याला स्वातंत्र्य असते. या स्वातंत्र्याचा जर आपण मुक्त वापर केला तर घटनेपासून व भूतकाळापासून मुक्त असा स्वतंत्र भविष्यकाळ आपल्याला घडवून आणता येतो.
भूतकालीन घटना बदलता येत नाहीत, पण त्यातून आपल्याविषयी काढलेल्या निष्कर्षांना मात्र मूठमाती देता येते. असे जर झाले तर जन्माला येणारे प्रत्येक मूल जसे एक कोरी पाटी घेऊन जन्माला येते, ज्यात अगणित आणि असामान्य शक्यता लपलेल्या असतात. त्यांचे पुनरुज्जीवन आपल्याला कुठल्याही क्षणी करता येते.
यानुसार आपल्या पाल्याची स्वप्रतिमा बदलण्यात आपल्याला सक्रिय भाग घेता येतो. नकारात्मक निष्कार्षांपासून त्याचे संरक्षण करता येते. आपणदेखील अनेक नकारात्मक निष्कर्ष पाल्यांच्या माथी मारतो त्यापासून स्वत:लाच परावृत्त करणे हे पालकांचे व शिक्षकांचे कर्तव्य आहे.
बालमानसशास्त्र, बालसंगोपन म्हणजे काय? याची काहीच कल्पना नसताना आपण सगळेच एके दिवशी आई किंवा बाप होतो. याविषयातला आपला एकुलता एक अनुभव म्हणजे आपल्या आई-वडिलांनी आपले केलेले संगोपन. तेव्हा आपले आपल्या पाल्यांच्या संगोपनाविषयीचे सर्व निर्णय आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या वागणुकीला दिलेली आपली प्रतिक्रिया असते. पण यातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.


 ------   स्वप्नील वाघमारे 

Saturday, February 9, 2013

Mujh mein tu, tu hi tu basa ......


 Mujh mein tu, tu hi tu basa  ............







Mujh mein tu, tu hi tu basa
Naino mein, jaise khwaab saa
Jo tu na ho toh pani pani naina
Jo tu na ho toh main bhi hunga main naa
Tujhi se mujhe sab ataa
Mujh mein tu... tu hi tu basa
Naino mein jaise khwaab saa

Ishq aashiqui mein
Kuch log chhant.ta hai
Zakhm bant.ta hai
Unhe dard bant.ta hai
Tod deta hai khwaab saare dekhte dekhte
Kar de barbaad saa
Jo tu na ho toh pani pani naina
Jo tu na ho toh main bhi hunga main naa
Tujhi se mujhe sab ataa
Mujh mein tu... tu hi tu basa
Naino mein jaise khwaab saa

Safar do kadam hai, jise ishq log kehte
Magar ishq wale, sab safar me hi rehte
Khatm hota na umr bhar hi, Ishq ka raasta
Hai ye behisaab sa
Jo tu na ho toh pani pani naina
Jo tu na ho toh main bhi hunga main naa
Tujhi se mujhe sab ataa
Mujh mein tu
Tu hi tu basa
Naino mein jaise khwaab saa


***** lyrics from Special 26 Hindi Movie