Thursday, March 22, 2012
Saturday, March 17, 2012
आपल्याला खरच आधाराची गरज आहे का ???????
आज अजून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटतेय.
एकदा एक बलाढ्य मोठा राजा आपल्या राज्यात फेरफटका मारत असतो , तिथे त्याला एक पक्षी विकणारा दिसतो . त्या पक्षी विकणाऱ्याकडे राजाला दोन अतिशय सुंदर , लोभस,मनमोहक असे पक्षी दिसतात . राजाला ते खूप आवडतात, राजा त्या दोन्ही पक्ष्याचे योग्य ती किमत त्या पक्षी विकणार्याला देऊन त्यांना आपल्या मोठ्या राजवाड्यात आणतो. ते दोन्ही पक्षी राजा आपल्या मोठ्या बगिच्याच्या मध्यभागी ठेवतो.
काही दिवस राजा स्वताहा त्या दोन्ही पक्ष्यांना जेवण आणि पाणी भरवत असे. त्याला त्या पक्ष्यांबद्दल खूप प्रेम वाटत असे. असा करता करता राजा रोजच्या दिवसातले काही तास त्या पक्ष्यासोबत घालवत असे. एके दिवशी राजाला असे वाटला कि आपण विनाकारण त्या पक्ष्यांना आपल्या प्रेमाच्या कैदेद ठेवले आहे, मग त्याने ठरवले कि आपण यांना त्यांच्या पिंजर्यातून मुक्त केले पाहिजे . राजाने मनात विचार पक्का केला आणि राजाने त्यांना त्यांच्या पिंजऱ्या मधून मुक्त केले.
दोन्ही पक्ष्या मधला पहिला पक्षी आपल्या मुक्तापानाचा आनंद घेत एकदम उंच उंच उडू लागला. सगळी कडे तो फेरी मारू लागला , या टोकाकडून त्या टोकाकडे तो उंच उंच भरारी घेत आपल्या आनंदात फिरू लागला. कधी या फांदीवर तर कधी त्या फांदीवर ,कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर नुसताच तो आपल्या आनंदात फिरू लागला. राजाला त्या पक्ष्याकडे बघून खूप आनंद झाला , राजाला वाटले कि मी विनाकारण त्या दोन्ही पक्ष्यांना आपल्या पिंजर्यात बांधून ठेवले. थोड्या वेळाने राजाचे लक्ष्य त्या दुसर्या पक्ष्याकडे गेले. तो पक्षी जवळच्याच झाडावर जाऊन एका फांदीवर बसला.
राजाला वाटले कि आपण त्या पक्ष्याचा घात केला , एका चांगल्या पक्ष्याला उडण्यापासून मी वंचित ठेवले. राजाला वाटले कि त्या पक्ष्याने पण पहिल्या पक्ष्या सारखे उंच भरारी घ्यावी , पण काही केल्या तो पक्षी जागेवरून हललाच नाही.दुसऱ्या पक्ष्याने पण उडाव असे राजाला वाटू लागला. राजाने त्याला उडवण्यासाठी प्रयत्न चालू केले , पण काही केल्या तो पक्षी काही उडतच नव्हता. राजाला थोडा राग आला पण राग न करता तो पक्षी का उडत नाही याची काळजी राजाला वाटू लागली.
राजाने गावात दवंडी पिटवली कि जो कोणी त्या पक्ष्याला उडवून देईल त्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल. बक्षिसाच्या लालसे पोटी बऱ्याच लोकांनी भरपूर प्रयत्न केले पण सगळ्यांना निराशाच हाती लागली . तो पक्षी काही केल्या उडण्यास तयार नव्हता . राजाला खूप वाईट वाटले , राजाने परत बक्षिसाची रक्कम वाढवली . परत नवीन नवीन लोकांनी त्या पक्ष्याला उडवण्यासाठी प्रयत्न चालू केले . कोणालाही यश संपादन झाले नाही , त्या पक्ष्याने काही ती फांदी सोडलीच नाही . काही जादुगारणी लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पण सगळेच अपयशी ठरले.मग तांत्रिक मांत्रिक या लोकांनी पण आपल्या प्रयत्नाची पराकाष्टा लावली , तरीही कोणालाही यश संपादन झाले नाही. तो पक्षी आपली फांदी काही केल्या सोडत नसे. राजाची चिंता अजून वाढू लागली होती. राजाने ज्या पारध्याने ते दोन पक्षी पकडले होते त्या पारध्याला सुद्धा पक्ष्यांना उडवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले , तो पारधीही अपयशी ठरला. ते पाहून राजा दिवसभर चिंतातूर राहू लागला , राजाचा अस्वस्थपणा वाढू लागला.
कोणीतरी राजाला सांगितले कि दुसऱ्या राज्यातून कोणी माणूस आला आहे, आपण त्याला प्रयत्न करण्यास सांगू या. राजाने लगेचच दोन लोकांना पाठवून त्या परदेशी माणसाला बोलवणे पाठविले. राजाने त्याला सगळी हकीकत सांगितली. तो माणूस राजाची परवानगी घेऊन त्या पक्ष्याकडे आला. थोड्याच वेळात तो पक्षी या फांदी वरून त्या फांदीवर फिरू लागला. त्या पक्ष्याने संपूर्ण बगीच्याचा ताबा घेतल्यासारखा तो सगळी कडे भरारी घेऊ लागला.
राजाने त्या पक्ष्याला बगिच्यामध्ये उंच भरारी घेताना बघितले आणि राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो लगेच बगिच्या मध्ये आला आणि त्या पक्ष्याच्या उडण्याचा आनद घेऊ लागला. राजाने त्या पर- प्रांतीय माणसाला भरगोस बक्षीस दिले. आणि त्याला विचारले कि तू त्याला कसे काय उडवले.
त्या पर प्रांतीय माणसाने एकदम अदबीने राजाला कुर्निसात करत सांगितले कि मी फक्त त्याचा आधार काढून घेतला आणि त्याने स्वताच आपल्याला असलेल्या पंखांचा वापर करून भरारी घेतली , म्हणजे तो पक्षी ज्या फांदीवर उभा होता ती फांदी मी कापून टाकली ,ज्या फांदीवर त्याने ईतके दिवस आधार घेतला होता तीच फांदी आता नसल्यामुळे त्याला उडण्याशिवाय पर्यायाच नव्हता.
जेव्हा आपल्याकडे काहीच आधार नसतो तेव्हा आपण आपली खरी ताकत ओळखतो. बऱ्याच वेळा आपल्याला कोणची न कोणाची आधाराची गरच असते , पण जेव्हा आपल्याला आपल्याकडील खऱ्या शक्तीची ओळख होते तेव्हा आपल्याला कोणाच्याही आधाराची गरज उरत नाही,आपण आपले जीवन सुंदर बनवत जातो. आपले जग हे आपणच सुंदर बनवावे तेही कोणाचे हि आधार न घेता .कधीही कोणावरही अवलंबून राहू नये. कधी हि कोणीही कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नये किवा कोणाचाही आधारवर जगण्याची सवय लाऊ नये.
@#@# स्वप्नील वाघमारे @#@#
Saturday, March 3, 2012
Hey bhagwan mujhko tuh jindagi dubara de
heyy.. choti si hai jindagi ,usse chota ek sapna
heyy.. choti si hai jindagi,usse chota ek sapna
ek baar is dharti pe dekh loon khuda apna
hey bhagwan mujhko tuh jindagi dubara de..
raat ke andhere mein , mujhe jo ujala de
jab thak jaaon toh apni ,god ka sahara de
hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..
aaj bhi tu dekhta hoga kahi dur satwan aasman
kaise khoya ja raha hai apne aap mein insaan
hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..
hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..
hey dil ko sambhaloon kaise ,tanhaayi mein doobi raat hai
hey dil ko sambhaloon kaise ,tanhaayi mein doobi raat hai
akele ho toh kya hua re ,uska jo sahara hai
hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..
heyy.. choti si hai jindagi,usse chota ek sapna
ek baar is dharti pe dekh loon khuda apna
hey bhagwan mujhko tuh jindagi dubara de..
raat ke andhere mein , mujhe jo ujala de
jab thak jaaon toh apni ,god ka sahara de
hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..
aaj bhi tu dekhta hoga kahi dur satwan aasman
kaise khoya ja raha hai apne aap mein insaan
hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..
hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..
hey dil ko sambhaloon kaise ,tanhaayi mein doobi raat hai
hey dil ko sambhaloon kaise ,tanhaayi mein doobi raat hai
akele ho toh kya hua re ,uska jo sahara hai
hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..
Lyrics of Raghu Dixit
Hey bhagawan
Subscribe to:
Posts (Atom)